शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्व नागरिकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना
कुटुंबाला दरवर्षी ₹५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया.
पिवळे / केसरी रेशन कार्डधारक कुटुंबे.
रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो.
प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सूचीबद्ध रुग्णालयात आरोग्य मित्रांशी संपर्क साधणे.
बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या ग्रामीण कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक अनुदान.
दारिद्र्यरेषेखालील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक.
आधार कार्ड, जॉब कार्ड, जागेचा पुरावा, बँक खाते.
ग्रामपंचायतीमध्ये अर्ज सादर करावा किंवा ऑनलाईन सर्व्हे.
महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा ₹१,५०० आर्थिक मदत.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावे.
आधार कार्ड, बँक खाते विवरण, उत्पन्नाचा दाखला, हमीपत्र.
नारी शक्ती दूत अॅप किंवा ग्रामपंचायत सीएससी केंद्र.
शेतकऱ्यांना वर्षाला ₹६,००० थेट बँक खात्यात मिळणारी केंद्र सरकारची योजना.
जमीनधारक शेतकरी कुटुंबे, आधार कार्ड असणे आवश्यक.
७/१२, ८-अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड.
महाडीबीटी किंवा CSC केंद्रावर ऑनलाईन अर्ज करावा.